शिक्षणपद्धती

प्रत्यक्ष कामावर आधारित अशा या पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी, विद्यार्थी स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी करत असलेले दैनंदिन काम आहे. विद्यार्थ्यांना या दैनंदिन कामात सुधारणा करता यावी यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन / सल्ला मिळणार आहे. तसेच अभ्यासक्रमावर आधारित इ-लर्निंग साहित्य उपलब्ध होणार आहे.
शिक्षण प्रक्रियेचे ठळक घटक पुढीलप्रमाणे:

  • दैनंदिन प्रत्यक्ष काम
  • दैनंदिन कामावर आधारित संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा, सल्ला व मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा
  • अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणासाठी दैनंदिन ऑनलाइन वर्ग