यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) विषयी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्य कायदेमंडळाच्या जुलै १९८९ कायदा क्र. २० - (१९८९)च्या अंतर्गत करण्यात आली होती. सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील नोकरीच्या उद्देशासाठी या विद्यापीठाची पदवी आणि पदविका यांना अन्य कोणत्याही विद्यापीठाची पदवी आणि पदविका यांच्याच दर्जाचे मानले जाते. विद्यापीठाच्या प्रमुख ध्येयांपैकी एक ध्येय हे ज्ञानाची निर्मिती करणे, त्याचे जतन करणे आणि विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये त्याचा प्रसार करून ‘मास-व्हर्सिटी (Mass-Varsity)’ बनणे हे आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या www.ycmou.ac.in


महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) विषयी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) ही महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २००१ साली पुरस्कृत केलेली एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. अध्यापन, अध्ययन, शैक्षणिक व्यवस्थापन प्रक्रिया व एकंदरीत सामाजिक-आर्थिक परिवर्तनशील प्रक्रिया यांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि याचे सार्वत्रिकीकरण याद्वारे शिक्षण व विकास यांचे एक नवीन प्रारूप निर्माण करणे हे MKCL चे उद्दिष्ट आहे.

एमकेसीएल फिनिशिंग स्कूल्स अंतर्गत प्रत्यक्ष कार्यानुभावर आधारित पदवी आणि पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. प्रत्यक्ष कामातून ज्ञान, आणि ज्ञानातून अधिक फलदायी काम या ‘नई तालीम’ तत्वावर आधारित हे अभ्यासक्रम आहेत. प्रत्यक्ष कामातून कौशल्य आत्मसात करणे, ई-लर्निंग व तज्ञ्यांच्या मार्गदर्शनाखाली थिअरीचा पाया पक्का करणे अशी या अभ्यासक्रमांची रचना आहे. ‘Learning through working’ अशी ही अभिनव शिक्षण पद्धती आहे. हे अभ्यासक्रम राबविण्यासाठी एम के सी एल च्या सहयोगी इंडस्ट्रीज / संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना वर्क लॅब उपलब्ध होते व व त्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाची संधी मिळते. या व्यतिरिक्त आपल्या गावातील / पंचक्रोशीतील स्थानिक संसाधनांवर आधारित, विविध सेवा क्षेत्र / व्यवसाय / उद्योग / संस्था इत्यादी मार्फत प्रत्यक्ष काम करून उपजीविका मिळवणाऱ्या युवक-युवतींना, आपल्या कार्यानुभवावर आधारित पदवी मिळवता येते.
अधिक माहितीसाठी भेट द्या : www.mkcl.org


वर्क-बेस्ड पदवी अभ्यासक्रम – बीबीए (बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट)

BBA(BPM) अर्थात वर्क-बेस्ड बी.बी.ए. ही १२ वी उत्तीर्ण होतकरू युवक – युवतींसाठी कार्यानुभवावर आधारित विशेष पदवी आहे. ग्रामीण, निमशहरी, तसेच शहरी भागात राहणाऱ्या १२ वी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी कमाईतून पदवीची ही अभिनव संधी आहे.
कोविडोत्तर काळात, नोकरी, रोजगार तसेच उपजीविकेची साधने बदलत आहेत. मोठ्या शहरांत राहून नोकरी, रोजगार, उपजीविका मिळवणं आव्हानात्मक होत आहे. जागतिक महामारीमुळे आपापल्या गावी परतलेल्या अनेक युवक-युवतींच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत आहे.
या पार्श्वभूमीवर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्क-बेस्ड बी.बी.ए या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. उच्च शिक्षणातील हा एक महत्वाचा प्रयोग आहे.
आपल्या गावातील / पंचक्रोशीतील स्थानिक संसाधनांवर आधारित, विविध सेवा क्षेत्र / व्यवसाय / उद्योग इत्यादी मार्फत प्रत्यक्ष काम करून उपजीविका मिळवणाऱ्या युवक-युवतींना, आपल्या कार्यानुभवावर आधारित BBA ही पदवी मिळवता येईल!
या अभ्यासक्रमामुळे स्थानिक उपजीविकेशी संबंधित आणि कार्यानुभवावर आधारित पदवी, मोठ्या शहरांत स्थलांतरित न होता एक व्यावसायिक पदवीधर होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे प्रत्यक्ष कामातील सुधारणांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे, कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातून अधिक फलदायी काम हा विशेष अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल.
सध्या स्थानिक पातळीवर विविध क्षेत्रात उपजीविका उपलब्ध आहेत.
काही क्षेत्रांची यादी पुढे दिली आहे. तपशीलवार यादी विद्यार्थ्यांना अर्ज करते वेळी उपलब्ध होईल.

  • नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन
  • वन व वनहक्क व्यवस्थापन, वनरोप वाटिका व्यवस्थापन, वनउपज म्हणजेच बांबू, लाकूड, वनौषधी, लाख यासंबंधीच्या प्रक्रिया आणि व्यवस्थापन
  • गाईंचे कृत्रिम रेतन, पशूपालन, उत्पादन व विक्री (गाई, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, गाढवे, कोंबड्या,इ.), मत्स्यपालन, मधमाश्या व रेशीमकिडे पालन, इ.
  • वन आणि वन्यजीव(Forest and Wildlife) क्षेत्र - वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफर, बर्ड स्पेशालिस्ट, पार्क रेंजर, ट्रेल व्यवस्थापक, Adventure गाईड, वाईल्ड लाइफ बायोलॉजिस्ट, मरीन लाइफ संशोधक, पर्यावरण कायदे तज्ञ, सल्लागार, पर्यावरण पत्रकार, लेखक, माहिती व्यवस्थापक, पर्यवेक्षक, प्रवर्तक, इको-पर्यटन, इ.
  • पाणी व्यवस्थापन क्षेत्र
  • कचरा व्यवस्थापन क्षेत्र (Waste management)
  • पारंपारिक कला आणि हस्तकला (Traditional Arts and Crafts)
  • ऊर्जा (Renewable energy) क्षेत्र
  • हरित प्रबोधन
  • शेती व शेतीपूरक व्यवसाय
  • पशू संवर्धन
  • शासकीय सेवा / सुविधा
  • आरोग्य सेवा
  • शिक्षण सेवा
  • स्वतंत्र व्यवसाय / दुकानदार
  • डिजिटल फ्रीलान्सिंग
  • इत्यादी...
    या व अशा क्षेत्रात उपजीविका करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाद्वारे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.