आपल्या गावातील / पंचक्रोशीतील स्थानिक संसाधनांवर आधारित, विविध सेवा क्षेत्र / व्यवसाय / उद्योग इत्यादी मार्फत प्रत्यक्ष काम करून उपजीविका मिळवणाऱ्या युवक-युवतींसाठी, कार्यानुभवावर आधारित ही विशेष पदवी आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काम करत असणे अपेक्षित आहे. विविध क्षेत्रांची यादी वेबसाईट वर उपलब्ध आहे. विद्यार्थी सध्या क्षेत्रात सध्या कार्यरत आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जात करणे आवश्यक आहे. पदवीच्या कालावधीत, म्हणजेच ३ वर्ष, विद्यार्थ्याने त्या क्षेत्रात सातत्याने काम करणे आवश्यक आहे. विद्यार्थी काम करत असलेल्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. प्रत्यक्ष कामात सुधारणा करण्यासाठी योग्य सूचना, थिअरी, आदर्श पद्धती याविषयी चर्चा करतील. प्रत्यक्ष कामातून ज्ञानाची निर्मिती करण्यास व त्यातून अधिक फलदायी काम करण्यास मदत करतील. विद्यार्थ्यांच्या कामाचे मूल्यमापन करतील. या पदवीद्वारे विद्यार्थ्यांना उपजीविका मिळवतानाच, व्यावसायिक पदवीधर होण्याची संधी मिळते. तीन वर्षे सातत्याने तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. इ-लर्निंग द्वारे अध्ययन करून थिअरी पक्की करता येते. ठळक वैशिष्ट्ये:
- शिक्षण, अनुभव, उपजीविका एकाच वेळेस ..
- स्थानिक उपजीविकेशी संबंधित आणि कार्यानुभवावर आधारित पदवी
- मोठ्या शहरांत स्थलांतरित न होता एक व्यावसायिक पदवीधर होण्याची संधी
- प्रत्यक्ष कामासंदर्भात तज्ञांचे वैयक्तिक मार्गदर्शन, ३ वर्ष, सातत्याने
- इ-लर्निंग द्वारे अभ्यासक्रम, स्वत:च्या स्मार्टफोन अथवा लॅपटॉपवरून अध्ययन
- ३ वर्षे (दर वर्षी २ सहामाही सत्र)
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सन्माननीय पदवी
- ३ वर्षांच्या कामाच्या मूल्यमापनावर आधारित MKCL तर्फे कार्यानुभवाचे प्रमाणपत्र