नियम

a) शुल्क परत करणेबाबत – अभ्यासक्रमासाठी जमा केलेले शुल्क परत अथवा हस्तांतरित केले जाणार नाही.
b) हा अभ्यासक्रम कार्यानुभावावर आधारित असल्याने, विद्यार्थ्याने प्रवेशाच्या वेळी जाहीर केल्यानुसार ३ वर्षांसाठी सातत्याने प्रत्यक्ष कामात सहभागी असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी एखाद्या संस्थेशी संलग्न होउन हा अभ्यासक्रम पूर्ण करत असल्यास त्या संस्थेचे नियम व अटी विद्यार्थ्यासाठी बंधनकारक ठरतील.
c) अभ्यासक्रम नोंदणी रद्द करणेबाबत आणि पुनर्नोंदणी साठी विद्यापीठाचे नियम लागू असतील.