वर्क-बेस्ड पदवी – बीबीए (बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट)
१२ वी उत्तीर्ण होतकरू युवक – युवतींसाठी कार्यानुभवावर आधारित विशेष पदवी - BBA(BPM) अर्थात
वर्क-बेस्ड बी.बी.ए. !
ग्रामीण, निमशहरी, तसेच शहरी भागात राहणाऱ्या युवक-युवतींसाठी कमाईतून पदवीची ही
अभिनव संधी आहे.
आपल्या गावातील / पंचक्रोशीतील स्थानिक संसाधनांवर आधारित, विविध सेवा क्षेत्र / व्यवसाय / उद्योग
इत्यादी मार्फत प्रत्यक्ष काम करून उपजीविका मिळवणाऱ्या युवक-युवतींना, आपल्या कार्यानुभवावर आधारित
BBA ही पदवी मिळवता येईल!
‘वर्क-बेस्ड बी.बी.ए.’ हा पदवी अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आणि
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
कमाईतून पदवी!
ठळक वैशिष्ट्ये:
- स्थानिक उपजीविकेशी संबंधित आणि कार्यानुभवावर आधारित पदवी
- मोठ्या शहरांत स्थलांतरित न होता एक व्यावसायिक पदवीधर होण्याची संधी
- विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे प्रत्यक्ष कामातील सुधारणांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
- कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातून अधिक फलदायी काम
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सन्माननीय पदवी